बुधवार, ३० मार्च, २०११

पप्पांचे मोर!

मोरपिसांचा गुच्छ घेऊन तुम्ही आलात
मी अत्यानंदाने ओरडले
'पहाटे सहा वाजता यावे लागेल, तुलाही पाहायची असतील तर!' तुम्ही म्हणालात.
मग मोरांच्या झुंडी कशा आल्या,
आणि पिसारा फुलवून तुमच्यासमोर ते नाचू कसे लागले:
याच वर्णन तुम्ही केलंत.
'उद्या नक्कीच' पिसांकडे झेपावत मी म्हणाले.
हे कितीतरी दिवस चाललं
पण तो उद्या कधीच नाही उजाडला...
आणि आता तुम्हीच नाही राहिलात
मोर पाहायला घेऊन जायला.

त्यावेळी जर मी आले असते तर!
तुमच्यासोबत काही क्षण घालवले असते तर!
त्या अविस्मरणीय आठवणींना मुकल्याचे दु:ख
माझ्या इवल्याश्या शरीरात मावेनासे झाले
आता ते मोर मला पाहायचेच होते,
तो रस्ता मला तुडवायचाच होता.
ज्या मोरांना त्या डोळ्यांनी बेभान होऊन पहिले
त्या मोरांना माझ्या डोळ्यात कायमचे कोरून ठेवायचेच होते.
मग आम्ही निघालो.
संध्याकाळच्या सहा वाजता.
कुणी म्हणाले मोर तेव्हाही येतात.
सगळा ओढा पालथा घातला.
तुमच्यासारखाच मोरही आमच्यावर रुसून बसला होता.
मग दूरवर कुठेतरी मोराचा डौलदार तुरा दिसला
आणि आम्ही पळालो
काट्याकुट्यातून, चिखलातून.
सगळे बेभान होऊन.
मोर मोर..पप्पांचे मोर!
शरीरातला कण न कण गात होता.
वरून दिव्य संधिप्रकाश पाझरत होता.
सारा आसमंत आमच्याबरोबर जणू तेच म्हणत होता.
आणि अचानक तो मोर आमच्या डोळ्यासमोरच अदृश्य झाला.
तुमच्यासारखाच!
खूप रडू आलं.
मोर न पाहता जायचं जीवावर आलं.
पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत
हे नुकतंच कुठं शिकलो होतो.
रडत रडत परतीच्या वाटेवर लागलो होतो.
आणि त्याच वेळी आमच्या समोरून
डौलात एक मोर आणि मोरणी येत होती.
पप्पा, तुम्हीच तर ती पाठवली नव्हती?
पुनर्जन्मावर माझाही विश्वास बसलाय आता,
त्या मोरांना बघायला जायचं,
कधीच चुकवणार नाही मी आता.

१० टिप्पण्या:

  1. Khup waet watle he wachun .... god has given you lots of energy to go through such incidences ...

    उत्तर द्याहटवा
  2. Very touching, I could feel that young girl's heart still crying..God has inscrutable ways..rest assured that your dad's spirit will always be watching over you. - Ashok P.

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर आणि मन हेलावणारी. खरोखर लहानपण आठवले. बाबाच्या बरोबर करावयाच्या अनेक गोष्टीची आठवण आली. Please Please keep it up.

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुंदर आणि मन हेलावणारी. खरोखर लहानपण आठवले. बाबाच्या बरोबर करावयाच्या अनेक गोष्टीची आठवण आली. Please Please keep it up.

    उत्तर द्याहटवा